spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वच्छ, सुंदर व हरीत नागपूरसाठी कटिबद्ध राहू या – महापौर निता ठाकरे यांचे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात नागरिकांना आवाहन

नागपूर :- राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा स्वच्छ, सुंदर व हरीत नागपूरचा शाश्वत विकास करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहू या, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी आज महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात केले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे मुख्यालयातील हिरवळीवर आज ( ता.1 मे) महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह धरमपेठ झोनच्या सभापती धनश्री देशपांडे, हनुमानगर झोनच्या सभापती ज्योती देवघरे, सतरंजीपुरा झोनच्या सभापती  अभिरुची राजगिरे, नगरसेविका योगिता तेलंग, नगरसेविका माधुरी फुलसुंगे (टेकाम), नगरसेवक विनोद कन्हेरे, नगरसेवक अभिजीत झा, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक राजेश्वर दिवटे, अतिरिक्त आयुक्त अंकित, प्र. अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य वित्त व लेखा अधिकारी सदाशिव शेळके,अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, लीना उपाध्ये, नगररचना विभागा उपसंचालक गिरीश गोडबोले, उपायुक्त निर्भय जैन, , उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त गणेश राठोड, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वृक्षसंवर्धक अमोल चौरपगार, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, नरेंद्र बावनकर उपस्थित होते.

प्रारंभी महापौर निता ठाकरे यांनी ध्वजवंदन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आहुती दिलेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली त्याचप्रमाणे जागतिक कामगार दिनानिमित्त सुद्धा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी ठाकरे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळे महाराष्ट्राला जगात एक वेगळी ओळख मिळाली आहे. यामुळे या मातीचा सर्वांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरची सुद्धा एक वेगळी ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहराचा विकासाचे विविध टप्पे गाठत आहे. त्यांचे राजकीय जीवन या नागपूर शहरातूनच सुरू झाले, हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्प्द आहे. प्रारंभी आयुक्त डॉ. विपीन यांनी महापौर निता ठाकरे यांचे मनपाचा मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले.

अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी उपमहापौर लिला हाथीबेड यांचे स्वागत केले. सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मानाचा दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व शुभांगी पोहरे यांनी केले.

Popular Articles