spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महानिर्मितीने घाटरोहणाच्या आंदोलकांच्या मागण्या केल्या मान्य 

– महानिर्मिती (को.प्र.) अकार्यक्षम ठरल्याने घाटरोह ना वासीयांचे ठिय्या आंदोलन केले होते

– तीन दिवसात घाटरोहना वासियांच्या आंदोला ना ला यश, सोळा युवकांना रोजगार उपलब्ध

कन्हान :- महानिर्मिती द्वारे घाटरोहना गावालागत कोळसा वाहुन नेण्यासाठी कनव्हेयर बेल्ट उभारलेला आहे. यामुळे निर्माण झालेल्या समस्या निवार्ण्यास ग्रा. प घाटरोहना सरपंच यांनी महजनको पत्र दिले. शासन निर्णयानुसार ८० % स्थानिकांना रोजगार देणे अनिवार्य असतांना रोजगारापासुन वंचित ठेवण्याचे काम महानिर्मिती कडुन होत असल्याने तसेच मागण्या पुर्ण करित नसल्याने याविरोधात सरपंच किशोर बेहुणे यांनी कंव्हेयर बेल्ट येथील काम थांबवुन बेमुदत ठिय्या आंदोनल केल्याने अखेरे तिसऱ्या दिवशी प्रशासनाला जाग आली आणि स्थानिय गरजवंत आठ युवकांना तात्काळ रूजु करून काही दिवसात उर्वरित ८ असे १६ युवकांना रोजगार देण्याचे महावितरणने मान्य करण्यात आल्याने. राजकीय सहकार्य शिवाय उभार लेले आंदोलन यशस्विकरण्यास ग्रामस्थांना यश आले.

महानिर्मिती कोराडी प्रकल्पाने १) कोल पाईप कंव्हेयर बेल्टचे काम करताना गावचा रस्ता क्षतिग्रस्त झाला तो ठीक करण्याचे निर्देश कंत्राटदारास दिले. परंतु ते काम अद्याप झाले नाही. २) सुरक्षा रक्षकांचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी हा काही कर्मचा-या ना दिला, मात्र मध्यंतरी कामावरून काढलेल्या कर्मचा ऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी अद्याप दिला नाही. ३) कोल पाईप कंव्हयेर बेल्टचे काम करताना उपासराव वहिले यांच्या शेतात बांधकाम करताना आश्वासन दिले कि त्यांना आर्थिक मदत म्हणुन १.५० लक्ष रु. मोबदला देऊ, परंतु बांधकाम त्यांचा शेतात पूर्ण झाले तरी त्यांना मोबदला मिळालेला नाही. ४) कंव्हेयर बेल्ट प्रकल्प उभारणीवेळी घाटरोहना येथील युवकांना रोज गार देण्याचे लिखित आश्वासन देण्यात आले. मात्र घाटरोहना ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यास महानिर्मिती (को.प्र.) अकार्यक्षम ठरल्यामुळे ग्रामस्थांनी सरपंच किशोर बेहुन, उपसरपंच अशोक पाटील, माजी उपसरपंच तेजराम सरिले यांच्या नेतृत्वात (दि. २४) सप्टेंबर २०२५ कंव्हेयर बेल्ट येथील काम थांबवु न बेमुदत ठिय्या आंदोनल सुरू केले होते. सलग तीन दिवस शांततेत आंदोलन सुरु असताना शुक्रवार (दि. २६) सप्टेंबर ला प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने आंदो लन दडपण्याचा प्रयत्न म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड हे दंगा नियंत्रण पथकासह आंदो लन स्थळी दाखल झाले असताना आंदोलक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यात बराच वेळ शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली. ज्यानंतर गावातील महिला, मुलं, वयस्क सगळे आंदोलन स्थळी दाखल झाले. शर्ते शेवटी महानिर्मिती कडुन चर्चेसाठी शिष्टमंडळ बोलविण्यात आले. खापरखेडा येथे महानि र्मितीचे मुख्य अभियंता गिरीश कुमलवार च्या दालना त तहसिलदार सुरेश वाघचौरे, पोलीस यांच्या उपस्थितीत सरपंच किशोर बेहुने, उपसरपंच अशोक पाटील, माजी उपसरपंच तेजराम सरिले, टेकाडी ग्रा पं सदस्य सतिश घारड या शिष्टमंडला सोबत तीन तास यशस्वि चर्चा झाली.

त्यानंतर मुख्य अभियंता गिरीश कुमलवार यांनी तात्काळ स्वरूपात कंत्राट पद्धतीने आठ युवकांना तसेच प्रकल्प सुरळीत सुरु होताच महिनाभरात उर्वरित आठ युवकांना रोजगार देण्याचे लिखित स्वरूपात दिले. त्यानंतर तहसिलदार यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता सरपंच किशोर बेहुणे यांनी फोनवर ग्रामस्थांना मागण्या मान्य झाल्याचे सांगुन आंदोलन माघारी घेण्याच्या सूचना केल्या. आंदोलनाला यशस्विकरण्या करिता सरपंच किशोर बेहुणे, उप सरपंच अशोक पाटील, माजी सरपंच तेजराम सारिले, माजी सरपंच दिगांबर ठाकरे, सदस्य राजकुमार बावणे , शशिकला सोनवाणे, सुनिता तांडेकर, रीना पाटील, सुरज पाटील, हुकूम सुर्यवंशी, नत्थु शिन्देकर, शामजी वाटकर, मोतीलाल बेहुणे, अमित छानीकर, जंगुल शेन्डे, संजय छानीकर, सिद्दार्थ पाटील आदी सह बहु संख्येने ग्रामस्थानी सहकार्य केले.

Popular Articles