Sunday, April 12, 2026
spot_imgspot_img
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

– पालकमंत्री ना. संजय राठोड यांचे अभिवादन 

यवतमाळ :- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी महात्मा ज्योतिबा फुले चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देत नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी नगर परिषदेमार्फत महात्मा फुले शाळेजवळील खुल्या जागेच्या सिमेंट काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला.

या प्रसंगी खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर तसेच नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com