नागपूर :- रामायण या महाकाव्याचे रचनाकार, आद्यकवी तसेच संस्कृत, ज्योतिष आणि खगोलशास्त्राचे प्रकांड पंडित महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
काटोल रोड येथील महावितरणच्या नागपूर परिमंडल मुख्यालयात (विद्युत भवन) आयोजित संक्षिप्त कार्यक्रमात अधीक्षक अभियंता दिपाली माडेलवार यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांच्यासह परिमंडलातील इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








