spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘मिसाईल मॅन’ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना महावितरणतर्फे अभिवादन

नागपूर :- महान शास्त्रज्ञ, द्रष्टे लेखक आणि कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्थान असलेले माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणने त्यांना अत्यंत आदराने अभिवादन केले. भारताच्या तंत्रज्ञान व आर्थिक प्रगतीसाठी 20 वर्षांचा दूरदर्शी कृती आराखडा देणाऱ्या आणि ‘मिसाईल मॅन’ म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलामांच्या प्रतिमेला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहली.

नागपूर परिमंडलाच्या काटोल मार्गावरील ‘विद्युत भवन’ या प्रशासकीय मुख्यालयात हा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अंजली देशपांडे यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा गौरवपूर्ण आढावा घेतला.

या कार्यक्रमात अधीक्षक अभियंता अमित परांजपे, दिपाली माडेलवार, प्रफुल लांडे, संजय वाकडे, वैभव पातोडे, तसेच कार्यकारी अभियंता चंदन तल्लरवार, प्रिती फुले, अमित शिवलकर यांनीही डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. तसेच उप महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक समीर सिंघम आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांच्यासह महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी डॉ. कलाम यांच्या उच्च जीवनमूल्यांचे स्मरण केले आणि त्यांच्या ‘मोठी स्वप्ने बघा आणि ती सत्यात उतरवा’ या ओळखीच्या संदेशाची आठवण करून दिली.

Popular Articles