spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

देशी दारुची वाहतुक करणाऱ्यास पकडले

 
आरोपी अटक, वाहनासह ८५,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त. 
 
कन्हान १३ : – पोलीसांच्या डीबी पथकाने सिहोरा मार्गावर अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करणाऱ्याला पकडुन त्याचा जवळुन दुचाकी वाहनासह एकुण ८५,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला.
         सोमवार (दि.११) ऑगस्ट ला दुपारी १२:३० वाजता दरम्यान पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात डीबी पथक अवैध धंध्यावर कारवा ई करणे कामी परिसरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि, कन्हान कडुन सिहोरा कडे इलेक्ट्रीक ओला मोपेड दुचाकी वाहनाने एक युवक अवैधरित्या देशी दारुची वाहतुक करित आहे. पोलीसां नी सिहोरा रोडवर नाकाबंदी करून कन्हान कडुन मोपेड दुचाकी वाहन क्र. एम एच ४० सीव्ही ३०१२ सिहोरा कडे जातांना दिसुन आली. वाहनाला थांबवुन पोलीसांनी आरोपी धर्मेंद्र अरविंद श्रोते (३०) रा. कन्हान यास ताब्यात घेऊन वाहनाची पाहणी केली असता कपड्याचा थैलीत ७० देशी भिंगरी निपा मिळुन आल्या, पोलीसांनी घटनास्थळ जप्त पंचनाम्या ची कारवाई करुन देशी दारु निपा किंमत ५,०४० रुपये आणि मोपेड दुचाकी वाहन किंमत ८०,००० रुपये असा एकुण ८५,०४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी आरोपी धर्मेंद्र श्रोते याचा विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात सपोनि  राहुल चव्हाण, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, मोहित झाडे, अश्विन गजभिये, जीवन विघे सह पोलीस कर्म चा-यांनी यशस्विरित्या पार पाडली.

Popular Articles