spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महा मेट्रो आणि कामठी नगर परिषद दरम्यान सामंजस्य करार

– महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• महा मेट्रोच्या वतीने कामठी येथील भूखंडांचा विकास

नागपूर :- महा मेट्रो नागपूर आणि कामठी नगर परिषद दरम्यान कामठी परिसरातील विविध भूखंडांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) आज करण्यात आला. हा करार महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे आणि महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या प्रसंगी अनिलकुमार कोकाटे, संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग), राजीव त्यागी, संचालक (प्रकल्प) तसेच मेट्रो आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महा मेट्रोचे संदीप बापट, कार्यकारी संचालक (मालमत्ता विकास) आणि कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विनोद जाधव यांच्यात हा करार पार पडला.

सदर सामंजस्य करारानुसार, पुढील भूखंडांचा विकास केला जाणार आहे: शुक्रवारी मार्केट, कामठी (एपीएमसी मार्केट) – एकूण क्षेत्रफळ: ३४,७०२ चौ. मी. (८.५ एकर), नीलम लॉनचे पुनर्विकास, कामठी– १४,९७६ चौ. मी. (३.७० एकर) विकास प्रस्तावित आहे.

करारानुसार, महा मेट्रो प्राथमिक सर्वेक्षण (टोपोग्राफिकल आणि जिओ-टेक्निकल) करून डिझाईन प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती संकलित करेल. महा मेट्रो, कामठी नगर परिषदेच्या पूर्वसंमतीने, प्रस्तावित प्रकल्पांचे डिझाईन्स, आराखडे, खर्चाचा अंदाज आदींचा समावेश असलेला आरएफपी (RFP) तयार केल्या जाई. महा मेट्रो ही अंमलबजावणी संस्था म्हणून कार्य करेल आणि संकल्पनात्मक आराखडा तयार करून जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांसमोर सादर करेल. पुढील कार्यवाही नगर परिषदेच्या नियमानुसार केल्या जाईल. करारानुसार, महा मेट्रो आर्किटेक्टची नेमणूक करून डिझाईन तयार करेल. हा प्रकल्प पीपीपी (Public-Private Partnership) तत्वावर महा मेट्रो नागपूरकडून राबविण्यात येणार आहे.

Popular Articles