अल्पवयीन मुलाने ४ वर्षांच्या चिमुकल्यावर केला अनैसर्गिक अत्याचार; आरोपी ताब्यात

0
54

 

नागपूर १ : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन परिसरात एका १६ वर्षीय मुलाने ४ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

ही घटना २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली. पीडित चिमुकल्याचे कुटुंब आरोपीच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहते. आरोपी अल्पवयीन मुलगा अनेकदा पीडित चिमुकल्यासोबत खेळत असे. घटनेच्या दिवशी, आरोपी त्याला आपल्या घरी घेऊन गेला आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. चिमुकल्याला वेदना होऊ लागल्यावर त्याने आपल्या आईला या घटनेची माहिती दिली.

चिमुकल्याच्या आईने तात्काळ यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम ३७७ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास करत आहेत.