spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नोकरी लावून देण्यासाठी आमदाराच्या नावाचा वापर करून घातला गंडा आमदार संदीप जोशींची पोलिसात तक्रार

 

नागपूर १२: आमदार संदीप जोशी यांच्या माध्यमातून तुमच्या पत्नीला लावून देतो असे सांगून तब्बल साडे चार लाख रुपयाचा गंडा घाणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध खुद्द आमदारांनीच पोलिसात तक्रार केली आहे.

अभय घोडवैद्य, रा. आदर्श नगर, दिघोरी असे त्या भामट्या तरुणाचे नाव आहे. तर फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव नीलेश खोडतकर असे आहे. खोडतकर यांच्या पत्नीला नोकरी लावून देण्याचे आश्वासन घोदवैद्य याने दिले होते. आमदार संदीप जोशी यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचे भासवून खोडतकर यांच्याकडून घोडवैद्य ने साडे चार लाख रुपये घेतले. मात्र, नोकरी न लावता दिलेले पैसेही परत केले नाहीत. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम रोख स्वरूपात दिली होती. पैसे परत करण्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे. अखेर नीलेश यांनी थेट आमदार संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केल्यावर हा गंभीर प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने याप्रकारची दखल घेत यासंदर्भात गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली. यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आमदर संदीप जोशी यांनी दिल्या आहेत.

Popular Articles