spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपातर्फे निवडणुकीच्या प्रचारासाठी १९ सभांना परवानगी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या उमेदवारांना विविध परवानग्या आणि प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी मिळावे याकरिता सिव्हील लाईन्स येथील मनपा मुख्यालयात कार्यान्वित असलेल्या ‘केंद्रीय एक खिडकी’ ची सुविधा करून देण्यात आली आहे. यामाध्यमातून आजवर विविध पक्षांच्या १९ सभांना परवानगी देण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी, यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा मुख्यालयातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयजवळ उमेदवार व राजकीय पक्षांच्या सोईसाठी ‘केंद्रीय एक खिडकी कक्ष’ कार्यान्वित करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रचाराकरिता विविध परवानगी सुविधा १३ जानेवारी रोजी सुरू राहणार आहे.

सभा परवानगी कक्षातर्फे आजवर १९ स्टार प्रचारकांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. स्टार प्रचारकांच्या रॅलींच्या नियोजित परवानग्यांसाठी रॅली परवानगी कक्षातर्फे २ रॅलींना परवागनी देण्यात आली आहे. नागपूर शहरात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना अधिकृत परवानगीसाठी वाहन परवाना कक्षातर्फे १५ वाहनांना प्रचाराकरिता परवानगी देण्यात आलेले आहे. निवडणूक प्रचारासाठी लागणाऱ्या डिस्प्ले आणि होर्डिग या अधिकृत जाहिरात फलकांसाठी जाहिरात परवाना कक्षातर्फे ५८ डिस्प्ले आणि २५२ होर्डिगला परवागनी देण्यात आले असल्याची माहिती ‘केंद्रीय एक खिडकी’चे प्रमुख अजय पझारे यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.