spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शहरातील १६१ कार वॉशिंग सेंटरची मनपाकडून तपासणी

नागपूर :- पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने पाण्याचा दुरुपयोग कारणाऱ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली असून, शहरातील दहाही झोनमधील १६१ कार वॉशिंग सेंटरची तपासणी करण्यात आली आहे. यात कार व इतर वाहने धुण्यासाठी विहिरीचे पाणी, कूपनलिका(बोरवेल) व तसेच मनपातर्फे पुरविण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्यचे निदर्शनास आले आहे. मनपाच्या उपद्रव शोध पथक व ओसीडब्ल्यूच्या पथकाद्वारे संयुक्तपणे पाहणी केली जात आहे.

महापौर निता ठाकरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी काही दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बेठक घेऊन संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे सुचविले होते. यात कार वॉशिंग सेंटर व जलतरण तलावांमध्ये होत असलेल्या पाणी पुरवठ्याची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार शहरातील १० झोनमध्ये उपद्रव शोध पथकाने धडक कारवाई केली. बहुतेक कार वॉशिंग सेंटरमध्ये विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. काही कार वॉशिंग सेंटरचे मालक पिण्याच्या पाण्याचा वापर यासाठी करीत असल्याचे दिसून आले आहे.

लक्ष्मीनगर झोनमधील 12 कार वॉशिंग सेंटरची तपासणी करण्यात आली, यात 7 ठिकाणी विहीर व 5 ठिकाणी बोअरवेलच्या पाण्याचा वापर होत असल्याचे दिसून आले. धरमपेठ झोनमध्ये एकूण 26 कार वॉशिंग सेंटरची पाहणी करण्यात आली. यात चार वॉशिंग सेंटरचे मालकी बेकायदेशीरपणे नळाद्वारे येणा्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी करीत असल्याचे निदर्शनास आले. हनुमाननगर झोनमध्ये 17 ठिकाणी विहिरीच्या पाण्याचा वापर होत असल्याचे तसेच उर्वरित ठिकाणी बोअरवेलच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

मनपाच्या उपद्रव शोध पथकाने शहरातील तपासणी केलेल्या कार वॉशिंग सेंटरची झोननिहाय माहिती पुढीलप्रमाणे.

लक्ष्मीनगर झोन -१२

धरमपेठ झोन-२६

हनुमाननगर झोन-२२

धंतोली झोन-१९

गांधीबाग झोन-१०

नेहरुनगर झोन-०९

सतरंजीपुरा झोन-१७

लकडगंज झोन-२५

आशीनगर झोन-०५

मंगळवारी झोन-१६

Popular Articles