spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे शहरात मतदार जागृतीसाठी मोहीम

– शहरात ३३५ ठिकाणी लावणार मतदार जागरुकता फलक

नागपूर :- नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी मोहिमेअंतर्गत नागपर शहरात ३३५ ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी फलक लावण्यात येत आहे.

येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरात विविध माध्यमांतून मतदार जागरुकता’ मोहीम राबवण्यात येत आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, वैष्णवी बी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात होर्डिंग्ज, बॅनर, स्टँडी, लिफ्लेट, स्टिकर, बॅजेस, जिंगल, बस स्टिकर आणि सेल्फी पॉइंट्स, एलईडी स्क्रीन, स्टॅडद्वारे नागरिकांना मतदानाचे आवाहन केले जात आहे.

शहरात वर्दळीच्या चौकांमध्ये ३५ ठिकाणी फलक लावण्यात येत आहे. महापालिकेतर्फे संचालित १०० बस गाड्यांवर सुद्धा मतदार जागरुकतेचे फलक लावण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उद्याने व रुग्णालयांमध्ये शहरात ४५ ठिकाणी मतदानासाठी मतदारांमध्ये जागरूकता करण्यासाठी फलके लावण्यात येत आहे.

मनपा मुख्यालय, झोन कार्यालये, खासगी ठिकाणे, शहर बस, बस थांबे, उद्याने आणि रुग्णालये अशा एकूण 335 ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Popular Articles