spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मनपातर्फे हुतात्म्यांना अभिवादन

 

नागपूर, ११ : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ९ ऑगस्ट, क्रांती दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने जुने मॉरिस कॉलेज टी पॉइंट, फ्रीडम पार्क (झिरो माईल मेट्रो स्टेशन) जवळील हुतात्मा स्मारकाला पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोवारी शहीद स्मारकावरही पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी आर्वीचे आमदार सुमित वानखेडे उपस्थित होते.

हुतात्मा स्मारकावर आयोजित करण्यात आलेल्या या छोट्या कार्यक्रमात मनपाच्या सहायक आयुक्त स्नेहलता कुंभार, नागपूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक गौरव समितीचे रघुवीर देवगडे, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, माजी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अनिल अहिरकर, शुभम वाघ, अमोल तपासे, शैलेश जांभुळकर, कमलाकर वैरागडे, अर्चना मालोकर, गणेश अजमेरे, मधुकर मालोकर, मस्के यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी, इतवारी येथील शहीद चौकात असलेल्या शहीद स्तंभाला आणि कॉटन मार्केट येथील शहीद स्मारकालाही पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अमोल तपासे, शैलेश जांभुळकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते. याशिवाय, मनपा मुख्यालयातील हुतात्म्यांच्या आणि क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनपातर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

Popular Articles