spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नांदगाव सरपंच अनिल पडोळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

किशोर साहू: मौदा ,ता. २० : येथून जवळच असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव येथील सरपंच अनिल नथू पडोळे (४८) यांना आज मंगळवार  (दि.१९ ऑगस्ट)ला सायंकाळी चार वाजता दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयात असताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. उपचारासाठी नागपूरला हॉस्पिटल येथे नेत असताना हॉस्पिटलच्या फाटका जवळच उपचारापूर्वीच त्यांनी सायंकाळी ६:३० वाजता दरम्यान प्राण सोडला.
त्यांच्यावर उद्या बुधवार (दि.२० ऑगस्ट)ला नांदगाव येथील स्मशानभूमीत दुपारी १२.०० वाजता दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, आई ,वडील व बराच मोठा आप्तपरिवार आहे. अल्पावधीतच चालता बोलता तरुण सरपंचाचे अविश्वसनीय निधन झाल्याने परिसरासह संपूर्ण मौदा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Popular Articles