spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लोकमान्य विद्यालय, बडेगाव येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम यशस्वी, सुमारे २४० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप; आरोग्यविषयक मार्गदर्शन

खापा, वार्ताहर :- केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची लोकमान्य विद्यालय, बडेगाव येथे यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शाळेतील सुमारे २४० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचा लाभ देण्यात आला.

१ ते १९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना कृमीदोषापासून मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. आतड्यांतील कृमींमुळे उद्भवणारा रक्तक्षय, अ‍ॅनिमिया आणि कुपोषण रोखण्यास या मोहिमेमुळे मदत होते. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांची शारीरिक वाढ व शैक्षणिक प्रगती चांगली व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र, बडेगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश रांजणे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले तसेच जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले.

मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मुख्याध्यापक गजानन कुरवाडे, शिक्षक सुरेंद्र बनसिंगे, नितीन निरगुडे, सचिन कुंथे, शिक्षिका वर्षा ठाकरे, जया हुमणे, मृणालिनी गभणे, भाग्यश्री वराडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी जितेंद्र गोसाई आणि हरिपाल बागडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Popular Articles