– ‘पंच परिवर्तन’ संकल्पनेवर भर
नागपूर :- नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन (NMO) विदर्भ प्रांताच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना व परिचय वर्ग नुकताच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील व्यास सभागृहात संपन्न झाला. या उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी अतुल मोघे (कार्यवाह, रा.स्व.संघ – विदर्भ प्रांत) होते. कार्यक्रमास डॉ. कुमार अंगदी आणि डॉ. नरेंद्र पालीवाल (सह-संघटन मंत्री, NMO राष्ट्रीय कार्यकारिणी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अतुल मोघे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, एनएमओच्या नियमित उपक्रमांमध्ये ‘पंच परिवर्तन’ ही संकल्पना अंतर्भूत केली पाहिजे. यात सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरिक कर्तव्यांची जाणीव, कुटुंब प्रबोधन, स्वदेशीचा अंगीकार या पाच घटकांचा समावेश आहे.

डॉ. नरेंद्र पालीवाल यांनी “एनएमओ परिचय” सत्रात संस्थेचे देशभरातील सामाजिक कार्य व वैद्यकीय क्षेत्रातले योगदान यावर प्रकाश टाकला. डॉ. कुमार अंगदी यांनी “लीडरशिप बियॉन्ड द लीडर्स – द एनएमओ वे” या विषयावर प्रभावी सत्र घेतले. त्यांनी संस्थेच्या मूल्याधिष्ठित कार्यपद्धतीवर भर देत सांगितले की, ही संस्था समाजात सकारात्मक व अमिट ठसा उमटवणारे कार्य करीत आहे. प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक डॉ. सुरेश चारी यांनी “२०२५ मधील आव्हाने” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. धीरज गुप्ता, संयोजक, NMO विदर्भ प्रांत यांनी, खरे नेतृत्व गुणधर्म यावर बोलताना संस्थेने यापूर्वी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमात NMO विदर्भ प्रांताच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा व अधिकृत स्थापना करण्यात आली. या वेळी राजेश लोया (नागपूर महानगर संघचालक) व अजय नवघरे (विदर्भ प्रांत सह-कार्यवाह) यांची उपस्थिती होती.
राजेश लोया यांनी नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आणि यशस्वी कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आली:
डॉ. निलेश अग्रवाल (प्रख्यात न्यूरोसर्जन) – अध्यक्ष
डॉ. धीरज गुप्ता (ख्यातनाम अस्थिरोग व सांधेरोपण शल्यविशारद) – महासचिव
डॉ. विवेक ठोंबरे – संघटन मंत्री
डॉ. राधा मुंजे – प्रथम उपाध्यक्ष
डॉ. अर्चना देशपांडे – द्वितीय उपाध्यक्ष
डॉ. रिपुंजय त्रिपाठी – कोषाध्यक्ष
डॉ. सजल बन्सल – सहसंघटन मंत्री
डॉ. निलेश चांगले व डॉ. गौरव विढाळे – संपर्क प्रमुख
डॉ. मनीष तिवारी – सह सचिव
डॉ. अमित कठोडे – सह कोषाध्यक्ष
डॉ. सुशील शिंदे – विद्यार्थी प्रभारी
डॉ. अक्षय ढोबळे – बौद्धिक प्रमुख
डॉ. काजल माटे – सह विद्यार्थी प्रभारी
या कार्यक्रमास डॉ. बी. एन. गंगाधर (माजी अध्यक्ष, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग), डॉ. दिलीप गुप्ता, डॉ. विन्की रुघवानी, डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. मनोज चांडक, डॉ. कांचन वनेरे, डॉ. कन्हैया चांडक, डॉ. मनीषा तामसकर यांच्यासह अनेक प्रख्यात डॉक्टर आणि मोठ्या संख्येने वैद्यकीय व दंतवैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचा धन्यवाद प्रस्ताव डॉ. गिरीश चारडे यांनी सादर केला.








