किशोर साहू, मौदा :- श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् सालवा तर्फे राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहा निमित्य राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत गुरुवार( दि.25 सप्टेंबर) ला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्य महाराष्ट्र शासनाने गरीब, दुर्बल तसेच मागासलेल्या लोकांच्या उन्नती व कल्याणाकरिता राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी व विविध योजनांबद्दल कला शाखेची पदवी प्राप्त करण्यासाठी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी येसंबा गावातील लोकांना माहिती दिली व त्यांचा समस्या जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना सुचविल्या.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत येसंबा उपसरपंच धनराज हारोडे,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण काळे, प्रा. ऋतुजा तुरनकर, प्रा. सविता महादुले, प्रा. ज्योती वानखेडे, प्रा. पायल कोसरे , सर्व विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.








