Friday, February 20, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) कडून तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर

यासीन शेख, गोंदिया :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुकाध्यक्षांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष रविकांत खुशाल बोपचे यांनी नियुक्तीपत्र जारी केले आहे.

यानुसार गोरेगाव तालुकाध्यक्ष पदावर दशरथ मेघनाथ बिसेन यांची नियुक्ती करण्यात आली असून, आमगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी तिरथ येटरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीनुसार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com