spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवीन कामठी पोलिसांनी सात लाख 77 हजार रुपयाचे जप्त केलेले साहित्य नागरिकांना परत केले

 – नागरिकांनी मुक्तकंठाने नवीन कामठी पोलिसांची प्रशंशा केली

कामठी:- नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील विविध गुन्ह्यात चोरीला गेलेला माल साहित्य नवीन कामठी पोलिसांनी चोरांकडून जप्त करून सात लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत केल्याने नागरिकांमध्ये पोलिसांन प्रती उत्साह दिसून आला अनेक नागरिकांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीची मुक्तकंठाने प्रशंसा केली गेल्या सहा महिन्यांपूर्वी पासून नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील 12 नागरिकांचे चोरीला गेलेले महागडे 12 मोबाईल फोन, एक लाख 40 हजार रुपयाचे सोन्याचे दागिने ,एक स्विफ्ट डिझायर चार चाकी वाहन एकूण 7 लाख 77 हजार रुपयाचा मुद्देमाल 15 नागरिकांना सहाय्यक पोलीस उपायुक्त अंकुश खेडेकर, नवीन कामठीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी ज्या मूळ मालकाचे साहित्य चोरीला गेले होते त्यांचे साहित्य आज नवीन कामठी पोलीस ठाण्यात बोलवून परत करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद दिसून आला प्रणय नागरे ,मोहम्मद इस्माईल सह इतर नागरिकांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली ते म्हणाले एकदा चोरीला गेलेला माल परत कधीच मिळत नाही पण नविन कामठी पोलिसांनी उत्तम प्रकारे गुन्ह्याची उघड करून हरवलेला माल साहित्य मूळ मालकाला परत केले त्याबद्दल आम्ही मुक्त कंठाने पोलीस प्रशासनाची प्रशंसा करीत असल्याचे सांगितले साहित्य परत करते वेळी पोलीस निरीक्षक सचिन यादव ,अखिलेश ठाकूर ,सीमा सळमते ,दिनेश ठाकूर ,कंचलता मडावी उपस्थित होते.

Popular Articles