Wednesday, February 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राकॉपा कन्हान व्दारे संत गाडगे बाबा जयंती व पत्रकारांचा सत्कार

कन्हान :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान तर्फे महान संत थोर कीर्तनकार आणि समाज प्रबोधनाचे अखंड दीप असलेले वैराग्यमुर्ती संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि शहरातील पत्रकारांचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात वरिष्ठ पत्रकार एन. एस. मालविय यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस ग्रामिण पत्रकार संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे आणि मार्गदर्शक अजय त्रिवेदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटा चे मौनधारणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वरिष्ठ पत्रकार एन. एस. मालविय व माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक यांनी महान संत गाडगे महाराज यांच्या जीवना वर आपले मनोगत व्यक्त करित त्यांनी केलेले कार्य आपल्या आचरणात आणण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी कन्हानचे पत्रकार एन एस मालविये, अजय त्रिवेदी, मोतीराम रहाटे, ऋृषभ बावनकर, किशोर वासाडे, रमेश गोळघाटे, मोहन रंगारी, विवेक पाटील, दिनेश नानवटकर, सुर्यभान फरकाडे, धनजय कापसी कर सह इतरही पत्रकाराना पेन डायरी व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील लाडेकर यांनी केले. यावेळी राकॉपा नागपुर ग्रामीण जिल्हा महासचिव अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संगीत पारधी, विनायकराव वाघधरे, संदीप कभे, स्वप्नील वाघधारे, सुनील लाडेकर, सम्राट पगारे, रोहित मानवटकर, रजनीश मेश्राम, राजेंद्र हटवार, हरीश खंगारे, अजय लोंढे, महेन्द्र चव्हाण, मनोहर मेश्राम, मुकेश करसोलिया, चेतन आंबिलडुके,नारायण गजभिये, राहुल सोनबरसे, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, संगीता खोब्रागडे, स्वाती पाठक, शशिकला बागडे, शुकेशनी बागडे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com