Tuesday, March 10, 2026
spot_imgspot_img
spot_img

नवनियुक्त आयुक्त डॉ. विपीन यांनी स्वीकारला पदभार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विपीन यांनी सोमवारी (ता.०९) मनपाच्या ५२ व्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मनपाच्या आयुक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी नवनियुक्त डॉ. विपिन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्तपदी बदली झाली. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदावर जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विपीन हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2014 च्या बॅचचे अधिकारी आहेत. प्रशासनात येण्यापूर्वी त्यांनी एमबीबीएसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केले असून, त्यांच्याकडे सध्या नागपूरच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार आहे.

पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त डॉ. विपीन यांनी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाच्या कार्यालयाला भेट दिली. तत्पूर्वी त्यांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्त, मुख्य अभियंता, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त यांच्यासह विभाग प्रमुख यांच्याशी सकारात्मक चर्चा केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com