– अशी पाखरे येती पुस्तकाचे प्रकाशन करताना अनिल पिंपळापुरे, नितीन मराठे, डाॅ. चारूदत्त मायी, लेखक निशिकांत मायी, प्रकाश एदलाबादकर
-‘अशी पाखरे येती’पर्यावरणयाेद्धे तयार करणारा ग्रंथ – अनिल पिंपळापुरे यांचे प्रतिपादन
नागपूर :- आपल्या सभाेवताल पर्यावरण आणि पक्षांबद्दल अतिशय आस्था असणारे आणि अजिबात ज्ञान नसणारे असे दाेन समाज पहावयास मिळतात. अशी पाखरे येती हा ग्रंथ पक्षांविषयी राेचक माहिती देतानाच या दाेन्ही समाजातील दरी कमी करणारा आहे. पक्षाच्या जीवसृष्टीतील स्थानाविषयी लाेकजागृती करणारे हे पुस्तक पर्यावरणयाेद्धे तयार करणारेही ठरणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पक्षी अभ्यासक अनिल पिंपळापुरे यांनी केले.
तरुण भारतमध्ये कार्यरत ज्येष्ठ पत्रकार निशिकांत मायी लिखित अशी पाखरे येती या पुस्तकाच्या प्रमुख अतिथी म्हणून ते प्रकाशन प्रसंगी ते बाेलत हाेते. तुटत चाललेला मानव आणि पक्षांचा सहसंबंध अधिक धृढ करण्याची गरज त्यांनी अधाेरेखित केली. 101 पक्षांचे जग अभ्यासू व राेचक पद्धतीने उगलडणारे हे पुस्तक श्री नरकेसरी प्रकाशनद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे. रामदासपेठेतील संस्कृती सेलिब्रेशनमध्ये आयाेजित या प्रकाशन साेहळ्याला अध्यक्षस्थानी इकाे बॅलन्स फाऊंडेशनचे संचालक नितीन मराठे हाेते. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डाॅ. चारूदत्त मायी आणि लेखक निशिकांत मायी व्यासपीठावर उपस्थित हाेते. डाॅ. चारुदत्त मायी यांनी मनाेगतात पक्षांचे पर्यावरण आणि शेतीसाठीचे महत्व कळण्यासाठी हा ग्रंथ महत्वाचा ठरणार असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात नितीन मराठे म्हणाले पक्षांबाबत अनेक भ्रामक कल्पना समाजात आहे. वनविभागाकडेही जंगलातील पक्षांची संपूर्ण माहिती नसल्याचे वास्तव आहे. आम्ही स्वतः पक्षांची यादी तयार करून वनविभाला दल्याचे ते यावेळी म्हणाले. शहरीकरणामुळे पक्षांच्या जीवनावर हाेत असलेला परिणाम लक्षात घेत यावर उपाय शाेधण्याची गरजही त्यांनी अधाेरेखित केली. प्रास्ताविकपर मनाेगतातून निशिकांत मायी यांनी पुस्तकाचा हेतू स्पष्ट केला. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. याप्रसंगी तरुण भारतचे प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य संपादक शैलेश पांडे, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजाजन निमदेव, ज्येष्ठ पत्रकार कमलाकर धारप यासह मान्यवर यावेळी उपस्थित हाेते. मायी परिवाराच्या वतीने मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.