Sunday, April 12, 2026
spot_imgspot_img
spot_img

14 एप्रिल रोजी, संविधान चौकातून, सकाळी ६ वाजता. लोकशाही बळकट करण्यासाठी मॅरेथॉन दौड निघणार

नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने 14 एप्रिल रोजी, लेडी गव्हर्नर कमल गवई माजी आमदार डॉ मिलिंद माने, झुंड सिनेमाचे शिल्पकार प्रा.विजय बारसे दिग्दर्शक नागराज मंजुळे प्रा.बबनराव तायवाडे प्रा. राजा ताकसाळे, महापौर निता ठाकरे राज्य सभेच्या खासदर माया ईवनाते आणि एड. शैलेश नारनवरे, प्राचार्य रीना जनबंधू, आर पी टी एस, कृष्णदत्त चौबे, डॉ प्रज्ञय ताकसांडे, डॉ. शरद सूर्यवंशी, गुरुदेव नगराळे यांच्या उपस्थितीत १४ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता. संविधान चौकातून तर पवित्र दीक्षाभूमीवर चित्रकला महाविद्यालय समोर मॅरेथॉन दौडची सांगता होईल. लोकशाही बळकट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष यशवंत तेलंग आणि महासचिव योगेश ठाकरे यांनी केले आहे. आंबेडकरी जनतेला नम्र विनंती करण्यात येते की या मॅरेथॉन दौडमध्ये पांढरे शुभ्र वस्त्र धारण करून मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावे व स्पर्धकांचे स्वागत करावे असे आवाहन केले जात आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र दहीकर, संदीप सिंग अग्रवाल, ज्योती रोशन ढोके, अनुपमा तेलंग, प्रीती दहीकर, मिलिंद कापुरे, अशोक चौधरी, हे परिश्रम घेत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com