खापा, वार्ताहर :- खापा शहरात डोंगेघाट येथील राम मंदिरात चैत्र नवरात्री व रामनवमी निमित्त श्री राम जन्मोत्सव निमित्त श्रीमद् भागवत कथा व ज्ञान यज्ञ सोहळा अखंड हरीनाम सप्ताह १९ मार्च ते २७ मार्च दरम्यान साजरा करण्यात आला. ह. भ. प. श्रावण महाराज भक्ते यांच्या अमृतवाणीतून कथा प्रवचन संपन्न झाले.
दैनंदिन कार्यक्रमात १९ मार्चला सकाळी १० वाजता कलश स्थापना करण्यात आली. सप्ताह दरम्यान दररोज सकाळी ६ ते ७ वाजे काकडा भजन आणि सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत रामकथा संपन्न झाली. २६ मार्च रोजी ह. भ. प. भुजंग महाराज पराते यांच्या हस्ते रामजन्माचे किर्तण झाले. ह. भ. प. श्रावण महाराज भक्ते यांच्या हस्ते दुपारी १ते ३ वाजेपर्यंत काल्याच्या कीर्तनाने सप्ताह संपन्न झाला.
या निमितताने खापा शहरातून चैत्र नवरात्री व रामनवमी निमित्त २६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता खापा डोंगेघाट येथील राम मंदिर येथून राम जन्मोत्सव मिरवणुकीचे भव्य आयोजन करण्यात आले. मिरवणुकीचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. भवानी माता मंदिर चौकात माळीपुराचा राजा गणेश उत्सव मंडळातर्फे राम भक्तांना थंड मठ्ठ्याचे वितरण करण्यात आले.
मिरवणुकीचे विशेष आकर्षण प्रभु श्री रामचंद्र, सिता, लक्ष्मण, हनुमान, खाटू श्यामच्या मुर्तीची आकर्षक सजावट करुण मिरवणुक काढण्यात आली. गौमातेची आकर्षक सजावट करून भक्तांसाठी दर्शनाला मिरवणुकीत ठेवले होते. लहान मुलांनी राम-सिता जोडी व हनुमानचे वेश परिधान धारण करून विशेष लक्ष वेधून या मिरवणुकीला आकर्षण आणले. मिरवणुकीत गोरिलाने लहान मुलांचे विशेष लक्ष वेधले. अनंता बोरीकर (पारडसिंगा म. प्र.) यांनी पवनसुत हनुमानाची आकर्षक भूमिका साकारली होती.
या मिरवणुकीत लहान मुले मुली, युवक युवती, वृध्द, महिला यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. मिरवणुकीच्या स्वागतासाठी संपूर्ण मार्ग महिलांनी रांगोळ्यांनी सजविले होते. गेल्या नऊ दिवसांपासून मंदिर परिसरात नवरात्रोत्सव सुरू आहे. मंदिरात २७ मार्च रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसाद वितरणनाने कार्यक्रमाची सांगता होईल. सप्ताह दरम्यान भावेश मनगटे, कल्पित धांदे, नैतिक बिजेकर, कौस्तुभ बडवाईक, मयूर बिजेकर, जय बिजेकर, बिट्टू मारोतकर, रोहित धांदे, कार्तिक धांदे, ओम गाठे, अंगद कोल्हे या लहान मुलांनी स्थानिक दैनंदिन कारभार सांभाळला.
या कार्यक्रमाचे आयोजन धनराज खुबाळकर, आतिश खुबाळकर, मुकेश पावडे, विनोद जांगडे, विष्णु बोरकर, रोशन बोरकर, शंकर गोखे, खेमाजी डेकाटे, रमेश जांगडे, गौरव मनापुरे, हर्षल मोहटे, विकास मारोतकर, खेमराज बारापात्रे, पवन पैठणकर, आकाश मारोतकर, बाल्या मांडवकर यांच्यासह समस्त शहरवासीयांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.