spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शालेय विद्यार्त्यांची बुद्धिमता तपासणी शिबीराचे आयोजन

सचिन चौरसिया, रामटेक २ :- तालुक्यातील सामान्य शाळेत दाखल मतिमंद, अध्ययन अक्षम तसेच इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे मानसशास्त्रीय मूल्यमापन शिबिर शुक्रवार (दि.०१)  ऑगस्ट ला स्नेह सदन विशेष शाळा शितलवाडी येथे रामटेक येथे संपन्न झाला. समग्र शिक्षा समावेशित शिक्षण व सी आर सी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) व अखिल भारतीय शिक्षा समागम (एबीबीएस) याचे औचित्य साधून विजय भाकरे गशिक्षणाधिकारी प.स. रामटेक यांच्या मार्गदर्शनात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रामटेक तालुक्यातील एकूण ५१ विद्यार्थ्यांचे मूल्यमापन मानसोपचार तज्ञ प्रा. अपर्णा भालेराव व प्रा. स्नेहल देवते सी.आर.सी, नागपूर यांच्या मार्फत करण्यात आले. सदर शिबिर आयोजित करण्याकरिता स्नेहसदन शाळेचे मुख्याध्यापक पंकज पांडे व समग्र शिक्षा मधील विशेष शिक्षक  विवेक झाडे, संदीप गोडघाटे व रश्मी झाडे यांचे सहकार्य प्राप्त झाले. शिबिराच्या यशस्वीतेकारिता मा. संचालक प्रफुल शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले

Popular Articles