spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नागपूर,दि. २० : जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर, मॉडेल करीअर सेंटर, नागपूर तसेच, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. २० आगस्ट रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, प्लॉट नं यु १३४-५ ब्लॉक इलेक्ट्रॉनिक झोन चौक, एमआयडीसी परिसर, हिंगणा रोड, नागपूर येथे करण्यात आलेले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये, SBI Life, Vindhya- E- Infomedia Pvt Ltd, Karan Communication, Usha Durge bahuudeshiya sansth, provincial Lifestyle Retails Services, Eros Infrastructure Pvt Ltd Mansha Tours Pvt Ltd. Late Usha Durge Bahuuddeshiy Sanstha इत्यादी ८८ पेक्षा जास्त कंपन्यांमार्फत ४५० पेक्षा जास्त जागांसाठी दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, आटीआय, डिप्लोमा इत्यादी पात्रताधारक उमेदवाराच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन उमेदवारांबी निवड केली जाणार आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील रोजगाराबाबत मार्गदर्शन केले जाणार असून जिल्हयातील उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित राहून रोजगार गेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सुनंदा बजाज, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांनी केले आहे.

@filephoto

Popular Articles