नागपूर, ता. ११ : स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्याकरिता आपला मालमत्ता कर भरून शहराच्या विकासात सहभागी व्हावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेद्वारा लकडगंज झोन येथील सर्व मालमत्ता धारकांना सूचित करण्यात आले आहे. मौजा नागपूर (खास), भरतवाडा, पुनापूर, हिवरी, भाडेवाडी, कळमना, पारडी आणि झोन चिखली (देव) येथील खुल्या भूखंडांसंदर्भातील मालमत्ता कराची देयके झोन कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहेत. मालमत्ता करदात्यांनी लवकरात लवकर झोन कार्यालयात संपर्क साधून आपली कराची देयके प्राप्त करून घेण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
या वर्षाचा मालमत्ता कर येत्या ३० जूनपर्यंत ऑनलाईन भरल्यास त्यावर करदात्यांना थेट १५ टक्के कर सवलत तात्काळ प्राप्त होणार आहे. यासाठी करदात्यांना www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन कर भरता येणार आहे. तसेच महानगरपालिकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन काऊंटवर कराचा थेट भरणा केल्यास करदात्यांना १० टक्के सवलतीचा फायदा मिळणार आहे.





