spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कन्हान येथे फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा

कन्हान :- परिसरातील केमिस्ट द्वारे फार्मासिस्ट दिवस शीतला माता मंदिर जे एन रोड कांद्री येथे कार्यक्रमास उत्साहाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पवन भिमनवार, जेष्ठ सदस्य राजेंद्र हटवार, राजेंद्र पोटभरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन दवाई विक्री आणि अनैतिक डिस्काउंटचा निषेध करण्यात आला. कार्यक्रमात विविध प्रकरची जनजागृति करुन ऑनलाइन औषधे खरेदी करणे टाळा, आपले प्राण वाचवा, ऑनलाइन खरेदी केलेल्या औषधाचा दर्जा संशयास्पद असतो. आपला विश्वास असलेला फार्मासिस्ट हा खरा आरोग्य संरक्षक असतो, आणीबाणीतील मित्र हा तुमचा परिचित केमिस्ट आहे. कुठलिही सवलत चांगल्या आरोग्यापेक्षा चांगली नाही. आरोग्याची सुरक्षितता आपल्या ओळखीचा केमिस्ट आहे. सवलतीच्या मोहात पडु नका. खरी औषधे खरेदी करा. आपल्या प्रियजनांशी चांगले वागा. सवल तींचा मोह थांबवा. आरोग्याशी संबंधित सर्व गोष्टींची काळजी घ्या. खोट्या जाहिराती टाळा. वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्यां केमिस्ट कडुनच औषधे खरेदी करा. बनावट औषधां पासुन सावध राहा. असे आवहन नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी शितल भिमणवार, कविता चव्हाण, शुभांगी ढोबळे, दीपक तिवारी, महेश मंगतानी , प्रकाश ढोबळे, शशीकांत पोहकर, हर्षल वैद्य, योगेश ईखार, रौनक चौकसे, रोशन किरपान, उमेश ठाकरे, इरिशाद सिद्धिकी, इरेशाद अहमद, मोहन जाधव, कृणाल नागदेवे, चेतन चोपडा सह नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.