spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवानिवृत्त सैनिकाची हरविलेल्या बॅगेचा अर्ध्या तासात पोलीसानी लावला शोध

– जेष्ट नागरिकास सापडली बॅग, जेष्ट नागरिकाचे आणि पोलीस शिपाईचे केले अभिनंदन

कन्हान :- शहरातील तारसा रोड शहिद चौक परिस रात सेवानिवृत्त सैनिक महेंद्र भगवे यांच्या दुचाकी वाहनातुन अचानक बॅग पडुन हरविल्याचे महेंद्र भगवे यांना कळताच त्यांनी शोध घेतला परंतु मिळुन न आल्याने त्यांनी पोलीसांना कळविताच पोलीस शिपाई आकाश सिरसाट यांनी कायदेशीर पद्धतीने योग्य कार वाई करित अर्ध्या तासात महेंद्र भगवे यांची बॅग मिळवु न दिल्याने महेंद्र भगवे यांनी जेष्ट नागरिक आणि पोली स शिपाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई चारून अभिनंदन केले आणि आभार मानले.

सोमवार (दि.२३) मार्च ला सायंकाळी ६ वाजता दरम्यान भारतीय सैन्यातुन सेवानिवृत्त सैनिक महेंद्र भगवे आपल्या दुचाकी वाहनाने कामठी मेथाडिस्टचर्च ला जात असतांना शहिद चौक परिसरात वाहनातुन बॅग पडली आणि समोर निघुन गेले. बॅग मध्ये सैनिक आय कार्ड, ईसीएचएस कार्ड, आर्मी सीएसडी कार्ड, पॅन कार्ड, ड्राईव्हींग लाईसेंस, वोटर आईडी, आधार कार्ड, एसबीआई एटीएम कार्ड, मोबाइल सह आदि महत्वाची कागदपत्रे होती. महेंद्र भगवे यांचा लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी पोहचुन शोध घेतला असता त्यांना बॅग मिळुन न आल्याने नाही. कन्हान पोलीस स्टेशन गाठुन पोलीस शिपाई अकाश सिरसाट यांना घटनेची माहिती दिली. आकाश सिरसाट यांनी सांत्वना देत काळजी करु नका, असे सांगुन कायदेशीर योग्य पद्धतीने कारवाई करित महेंद्र भगवे यांचा मोबा इल लोकेशन शोधुन काढला. सदर बॅग रामु अर्जुनराव धकाते वय ६७ वर्ष जेष्ट नागरिक रा. इंदिरा नगर कन्हा न यांना रस्त्यावर पडलेला अवस्थेत आढळुन आल्याने त्यांनी आपल्या घरी नेली. लोकेशनच्या आधारे पो.शि आकाश सिरसाट सह पोलीस कर्मचारी यांनी योग्य पद्धतीने कारवाई करित रामु धकाते यांचा निवास्थानी जाऊत त्यांना आढळुन आलेली बॅग महेंद्र भगवे यांच्या सुपुर्द केली.

पोलीस शिपाई आकाश सिरसाट यांनी योग्य पद्धतीने कारवाई केल्याने आणि रामु धकाते यांनी सुरक्षित पणे बॅग ठेवल्याने महेंद्र भगवे यांनी दोघांना पुष्पगुच्छ देऊन आणि मिठाई चारून दोघाचेही अभि नंदन केले आणि आभार मानले. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, थानेदार वैजयंती मंडवधरे, भारतीय सेवा निवृत्त सैनिक राज एस. भगवे, रोहन पटेल आदी उपस्थित होते.

Popular Articles