खापा :- पोलीस स्टेशन खापा चे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे आणि प्रशांत गोविंदवार, नायब तहसीलदार सावनेर यांनी संयुक्त कारवाई अंतर्गत पोलीस स्टेशन खापा हद्दीतील गोसेवाडी रेती घाटास भेट देऊन पाहणी केली. सदर भेटीचा उद्देश रेती उत्खनन व वाहतूक याबाबत शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खातरजमा करणे हा होता.
या संयुक्त पाहणीदरम्यान रेती घाटावरील परिस्थिती, परवानगीप्राप्त उत्खनन, वाहतूक व्यवस्था तसेच कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन सुरू आहे काय, याची तपासणी करण्यात आली. सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असल्याचे आढळून आले, सीसीटीव्ही कॅमेरांच्या अनुषंगाने थेट पाहणी करण्याची यंत्रणा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना रेती घाट व्यवस्थापकाला देण्यात आल्या.