कामठी :- महिला पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या संकल्पनेतून आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ‘पोलिस दलावर महिला पोलिसांचे कंट्रोल’या अभिनव उपक्रमा अंतर्गत स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे एक दिवसाचा कारभार एक दिवसाची पि आय म्हणून पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांना पदभार देण्यात आला.
याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यादव, महिला पोलीस कर्मचारी, आदी उपस्थित होते.
नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे या यांच्या अध्यक्षतेखाली 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने पार पडला असून कार्यक्रमाची सुरुवात पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर एक दिवसाची महिला पी आय मनीषा जाधव ,सहकारी उपस्थित महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले की भारतीय संस्कृतोत महिलांना देवीचे स्थान असून त्यांना पुज्यनिय ठरविले आहे तेव्हा समाजामध्ये महिलांचा आदर सम्मान वाढलाच पाहिजे. समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत निराधार महिलांना आधाराचे स्थान मिळावे यासाठी समाजाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.कार्यक्रमाचे संचालन पोलिस कर्मचारी संगीता नरुले तर आभार दीप्ती मोटघरे यांनी मानले.
दरम्यान आज पोलीस दीदी यांनी *महिला दिन निमित्ताने किशोरी ताई भोयर सायन्स कॉलेज व फार्मसी गर्ल्स हॉस्टेल कामठी येथे मीटिंग घेण्यात आली. मीटिंगमध्ये 25 ते 30 मुली व हॉस्टेलचे स्टाफ उपस्थित होते.
सदर मिटिंग मधे सर्वांना ऑपरेशन थंडर , तसेच ऑपरेशन शक्ती , मोहीम बाबत तसेच बालविवाह मुक्त महाराष्ट्र संकल्प आपला अभियान याबाबत योग्य ती माहिती देण्यात आली.