Saturday, March 28, 2026
spot_imgspot_img
spot_img

कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित वेतन व मृत कामगारांच्या लाभांबाबत सकारात्मक बैठक

– तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचा पाठपुरावा यशस्वी

नागपूर :- तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशनची कामगार आयुक्त, मुंबई तसेच महावितरण प्रशासन यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने व कार्याध्यक्ष विक्की कावळे उपस्थित होते.

बैठकी दरम्यान स्मार्ट सर्व्हिसेस व क्रिस्टल या कंत्राटी कंपन्यांच्या कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. त्यावर स्मार्ट सर्व्हिसेस कंपनीने जानेवारी २०२६ पर्यंतचे वेतन लवकरच अदा करण्यात येईल असे आश्वासन दिले, तर क्रिस्टल कंपनीने फेब्रुवारी २०२६ पर्यंतचे वेतन अदा केल्याची माहिती दिली. तसेच कंत्राटी कामगारांना नियमित व वेळेवर वेतन मिळावे यासाठी कामगार आयुक्तांनी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. इतर कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय मयत कंत्राटी कामगार केशव वाकुडकर व स्व. रामभाऊ बोरकर यांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतर मिळणारे आर्थिक लाभ तातडीने देण्यात यावे, अशी मागणी असोसिएशन तर्फे करण्यात आली. यावर संबंधित लाभ लवकरच देण्यात येतील. असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. असोसिएशनतर्फे सांगण्यात आले की, कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी व न्यायासाठी संघटना भविष्यातही ठामपणे लढा देत राहील.

–विक्की कावळे राज्याध्यक्ष तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com