spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रहारची मुंडीकोटा गावाला पोलीस स्टेशन देण्याची मागणी

 

अमरदिप बडगे, तिरोडा १४ :- मुंडीकोटा गावाला प्रहार जनशक्ती पक्ष तालुका तिरोडाच्या वतीने पोलीस स्टेशन देण्याची मागणी केल्या जात आहे .
मुंडीकोटा हे गाव बाजारपेठ असून या मध्ये 27 गावाच्या समावेश येत असुन अंदाजे 45 हजाराच्या जवळपास लोकसंख्या असून मुंडीकोटा हे गाव बाजारपेठ असुन वर्दळीचे गाव आहे.गावाजवळच घाटकुरोडा गाव असुन रेती घाटामधून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या चोरी होत असते. त् मुंडीकोटा ला पोलीस चौकी असून अपुरे पोलीस कर्मचारी तैनात आहेत. पोलीस कर्मचाऱ्यांना 27 गावाच्या कारभार असल्यामुळे त्यांना सांभाळणे कठीण जाते. त्यामुळे मुंडीकोटा बाजारपेठ असून रेल्वे स्टेशन, आरोग्य केंद्र असुन मुख्य बाजारपेठचे गाव आहे . मुंडीकोटा गावाला पोलीस स्टेशन देण्यात यावे. अशी मागणी प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रदीप निशाने यांनी जिल्हाधिकारी , पोलीस आयुक्त , पोलिस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे दिले आहे. मुंडिकोटा हे गाव मुख्य असून गावात आजूबाजूच्या परिसरात लहान मोठे गुन्हेगारी,घरफोडी मारामारी प्रकरण होत असतात.अशावेळी नागरिकांना पोलीस चौकी बंद जर असली तर तालुका तिरोडा येथे 18 ते 20 किलोमीटर अंतर गुन्हा नोंद करण्यासाठी गाठावे लागत असते. मुंडीकोटा गावात जर पोलीस स्टेशन आले तर नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होईल.मुंडीकोटा गावाला पोलिस स्टेशन देण्यात यावे हिच मागणी आता तालुका प्रहार पक्षाकडून होत आहे . अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखिल देण्यात आला आहे.यावर आता संबंधित प्रशासन कोणतं पाऊल उचलते याकडे नागरिकाचे लक्ष लागून आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.