Wednesday, February 18, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रा.संध्या राजुरकर, उषा बौद्ध यांना स्मृतीशेष नीता दिलीप मून सन्मान पुरस्कार घोषित

नागपूर :- सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात सक्रिय कार्य करणाऱ्या दैनिक बहुजन सौरभच्या निवासी संपादक प्रा. संध्या राजुरकर आणि सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या उषा बौद्ध यांना ‘स्मृतीशेष नीता दिलीप मून हा रोख रक्कम सह सन्मान पुरष्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरष्कार 8 मार्च 2026 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून आणि स्मृतीशेष नीता दिलीप मून यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदान केला जाणार आहे.

संध्या राजुरकर यांनी या दैनिक वृत्तपत्राच्या माध्यमातून बुद्ध-फूले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा सतत प्रचार प्रसार करण्याचे कार्य त्या करत आहेत. बालपणी डॉ. आंबेडकरांचे पुस्तके वाचून ते विचार डोक्यात घेऊन आंबेडकरी विचाराने अधिक प्रगल्भ होत गेल्या. पत्रकारितेच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त असलेल्या संध्या राजुरकर यांच्या खडतर परिश्रम व निष्ठेला मिळालेला हा सन्मान आहे.

धार्मिक, सामाजिक क्षेत्रात अग्रस्थानी असलेले दुसरे नाव म्हणजे उषा बौद्ध ! अन्य समाजगटात आंबेडकरी विचारांची, संवैधानिक मूल्यांची पेरणी करणारे व्यक्तीमत्व असून खैरलांजी, अंबाझरी आंदोलन, महिलांचे सक्षमिकरण, कोरोना काळात झोपडपट्टीत जाऊन केलेले कार्य, अंधश्रद्धा, कुप्रथा दूर करण्यासाठी सातत्याने केलेले कार्य अशा विविध कार्यातून उषा बौद्ध यांची कर्तव्यनिष्ठा दिसून येते. आजही त्या पारिवारीक धम्मसंगोष्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. माता रमाई, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित एकपात्री नाटकातून समाजप्रबोधन करण्याचे त्यांचे कार्य करीत आहेत. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असणाऱ्या प्रा. संध्या राजुरकर आणि उषा बौद्ध यांच्या मोलाच्या कार्याची दखल प्रभावती वैद्य इंस्टीट्यूट ऑफ नॉलेज अँड एम्पावरमेंट नासिकचे अध्यक्ष माजी न्यायाधीश आणि सुप्रसिद्ध लेखक अनिल वैद्य आणि संस्थेच्या सचिव अॅड रेखा धुळधूळे यांनी सामाजिक कार्यात सहभागी असलेल्या महिलांच्या सन्मानार्थ ‘स्मृतीशेष नीता दिलीप मून हा पुरस्कार घोषित केला आहे. या पुरस्काराचे प्रायोजक दिलीप मून, सेवानिवृत्त बँक अधिकारी नागपूर हे आहेत. वंदना संघ दीक्षाभूमी, धम्मसंगोष्टी मनीषनगर, सम्यक संकल्प संघ, महिला सशक्तीकरण संघ, राष्ट्रीय पारिवारीक धम्म सांगोष्टी, बहुजन मैत्री संघ नरेंद्रनगर, आविष्कार संगीत अकादमी या सर्व संघटनांतर्फे संध्या राजुरकर आणि उषा बौद्ध यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com