spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हुडकेश्वर परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश : आई आणि मुलाला अटक, पीडित तरुणीची सुटका

 

नागपूर २० : शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात आई आणि मुलाला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, एका पीडित तरुणीची सुटका करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनीता विकास कांबळे (वय ४६) आणि यश विकास कांबळे (वय २६) अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून संत ताजेश्वर नगर, हुडकेश्वर लेआउट, प्लॉट क्रमांक ३२, घर क्रमांक ९६ या पत्त्यावर फ्लॅट भाड्याने घेऊन वेश्या व्यवसाय चालवत होते.

बाह्यरूपाने आरटीओमध्ये ब्रोकरेजचे काम करणारे भासवणाऱ्या या आरोपींनी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून नागपूरला बोलावून अनैतिक धंद्यात ढकलले होते. गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पथकाने बोगस ग्राहकाच्या मदतीने सापळा रचत १,००० रुपयांत ऑनलाइन व्यवहार निश्चित केला.

यानंतर, पीडित तरुणी खोलीत पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले. छाप्यादरम्यान छत्तीसगड येथील २७ वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली.

पोलिस सूत्रांनुसार, ही कारवाई शहरातील वाढत्या अनैतिक व्यवसायांविरोधातील धडक मोहिमेचा भाग असून नागपूर पोलिसांची अशी मोहीम पुढेही सुरू राहणार आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

@filephoto

Popular Articles