कळमेश्वर :- कळमेश्वर पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, मौजा गोंडखैरी शिवारात मोहाफुल हातभट्टीची दारू काढल्या जात आहे. अशी माहीती प्राप्त होताच कळमेश्वर पोलीसांनी घटनास्थळी जावुन कारवाई केली असता ०५ महिला आरोपी या मोहाफुल सडवा आणि दारू गाळण्याच्या साहीत्यासह हातभट्टी लावुन दारू गाळतांना मिळुन आल्या. नमुद हातभट्टया नष्ट करून मुद्देमाल जप्त केला.
पोलीसांनी पंचासमक्ष १) ५०२० लिटर मोहाफुल सडवा रसायन, २) १६० लिटर मोहाफुल गावठी दारू ३) लोखंडी ड्रम, प्लास्टिक ड्रम इतर साहित्य असा एकुण २,०९,१००/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट केला. नमुद ५ महीला आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकुण ०५ गुन्हे नोंदविण्यात आले आहे.