spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रजनीकांत बोरले यांचा फळ (सफरचंद )तुला भार

संजय कारवटकर, यवतमाळ २० :  पाटणबोरी येथील व्यापारी संघटना यांच्या तर्फे कृषिउत्पन्न बाजार समिती व्यापारी गनातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्या निमित्याने पाटणबोरी  व्यापारी संघटने तर्फे काल दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता जावेद भाई शेख यांच्या दुकान गाड्याच्या पटांगणात  रजनीकांत डालूराम बोरले यांचा शेफ (सफरचंद)फळाने तुला भार करण्यात आला. या  कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती  रजनीकांत डालूराम बोरले, प्रमुख अतिथी गणेशलाल लक्ष्मणलाल अग्रवाल, व्यापारी संघटना अध्यक्ष सचिन सुरेश गंगाशेट्टीवार, राजू भाऊ बोरले हे मंचकावर उपस्तित होते. यावेळी सत्कार मूर्ती  रजनीकांत बोरले यांचा  हार पुष्प गुच्छ देऊन गणेश लाल अग्रवाल यांनी सत्कार केला, तर प्रमुख पाहुणे  गणेशलाल अग्रवाल यांचा स्वागत व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष निलेश यमसनवार यांनी केले, सचिन गंगाशेटीवार यांचा पुष्प गुच्छ देऊन  सत्कार जावेद भाई शेख   यांनी केला. राजू भाऊ बोरले यांचा सत्कार नंदकुमार अर्गुलवार यांनी केला. व्यापारी संघटने तर्फे सन्माननीय  रजनीकांत बोरले यांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी पाटणबोरी प्रतिष्टीत व्यापारी उमेश अण्णा यमसनवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले,सचिन गंगाशेट्टीवार यांनी आपले मत मांडले. तर सत्कार मूर्ती  रजनीकांत बोरले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरते शेवटी सत्कार मूर्ती यांचा शेफ (सफरचं) फळांनी तुलभार करण्यात आला. या कार्यकामाचे आयोजन पाटणबोरी व्यापार संघटने आयोजित केला.संचलन शेखर सिडाम यांनी केले. तर आभार प्रदर्शन निलेश यमसनवार यांनी केले. या वेळी गावातील व्यापारी, नागरिक, व हमाल उपस्तित होते.

Popular Articles