spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रक्षाबंधन : बहीण भावाच्या नात्याची घट्ट वीण !

 

सचिन चौरसिया, रामटेक १२ :– बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय जनता पार्टी महिला आघाडी रामटेक तालुका व शहराच्या वतीने पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय व एसडीओ कार्यालयात नियमित सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बहीण भावाच नातं अधिक वृध्दिंगत व्हावं या भावनेतून आम्ही सर्व भगिनींनी रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला. रामटेक चे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे, पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी आम्हा सर्व बहिणीची आस्थेने विचारपूस केली. यावेळी नगरपालिकेच्या माजी उपाध्यक्ष कविताताई मुलमुले, माजी नगरसेविका उज्वलाताई धमगाये, चित्राताई धुरई, पद्माताई ठेंगरे, अनिताताई टेटवार, लताताई कामळे, अर्चना ठक्कर, श्वेता गोन्नाडे, समिता पटले, नेहा गावंडे, अर्चना बनगैया, श्रद्धा कावळे, सोनी धुरई, रोहिणी नागोसे, वनिता बोंद्रे सह भाजपा महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles