– ‘जय श्रीराम’ च्या गजराने दुमदुमली रामनगरी
– गडमंदिरावर राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- विदर्भाची अयोध्या म्हणून प्रख्यात असलेल्या रामटेक येथील गडमंदिरावर” राम जन्मला ग सखे राम जन्मला”.. अश्या भक्तीमय वातावरणात सुप्रसिद्ध आणि पुरातन श्रीराम मंदिरात गुलाल उडवून राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राम जन्मोत्सात नगारा व चौघडा वादनाने सकाळी सहाच्या सुमारास वातावरण भक्तीमय झाले होते. ‘जय श्रीराम’ च्या गजराने संपूर्ण रामनगरी दुमदुमून गेली होती. प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर अभिषेक करून पारंपरिक वस्त्र परिधान करून आभूषणं चढवण्यात आली.
दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव सोहळा रामटेक गडमंदिरात उत्साहात वाजतगाजत पार पडला. गुढीपाडव्यापासून रामटेकच्या गडावर प्रभू श्रीरामाच्या चैत्र नवरात्रास प्रारंभ झाला रामनवमीता श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा गुरुवार, २६ मार्चला दुपारी १२ वाजता साजरा करण्यात आता राममंदिराचे पुजारी मंगेश पंडे, मोहन पंडे तर लक्ष्मण मंदिराचे पुजारी अविनाश पंडे, राम पंडे, धनजय पंडे, संजय पड़े पांनी पहाटे धार्मिक विधीवत पुजेता प्रारंभ केला ठिक दुपारी १२ वाजता रामभक्तांनी गुलाल, जबर उपळून, फटाक्यांची अतिषबाजी करून जप श्रीराम जय घोषणांनी संपूर्ण तपोभूमी नामस्मरमाने मंत्रमुग्ध झाली.
भाविकांनीही दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिरात काटेकोर व्यवस्थापन करण्यात आले होते. यावेळी संपुर्ण रामनगरी भगव्या पताकांनी आकर्षक सजलेली होती. राममंदिरसह गडमंदिर परिसरात करण्यात आलेली विद्युत रोषणाई सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. भक्त गणांकडून भाविकांकरिता विविध ठिकाणी पाणपोई, महाप्रसाद, शरबत तथा मठ्ठा वाटप करण्यात आले. विदर्भसह मध्यप्रदेश तथा छत्तीसगड राज्यातून आज येथे हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण गडमंदिरावर दर्शनासाठी आलेले होते. दरम्यान श्री संत लोटांगण महाराज भक्त परिवारातर्फे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत गडमंदीर पार्किंग परिसरात किर्तन, भजन, दिंडी सोहळा तथा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते.
चैत्र शुद्ध नवमीला श्रीराम जन्म
चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचागानुसार अत्यंत महत्वाचा दिवस आहे. या तिथीला भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या जाणाऱ्या ‘प्रभू रामचंद्राचा’ जन्म झाला. या दिवसाला ‘रामनवमी’ असे म्हणतात. ज्याप्रमाणे श्री कृष्णाचा जन्म रात्री १२ वाजता झाला असे म्हणतात तसेच प्रभू रामाचा जन्म सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी १२ वाजता झाला.