spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कुहीत जय श्रीरामाच्या जयघोषात रावणदहन

– दहन बघण्यासाठी गर्दी; सियाँवर रामचंद्र की जय चा जयघोष

साळवा :-  वाईटावर चांगल्या प्रवृत्तीचा विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमीचा सण रावण दहनाने उत्साहात साजरा झाला. मागील काही वर्षांची जुनी परंपरा असलेल्या श्री महारुद्र हनुमान मंदिर (खातीपुरा) येथील अंगणवाडीच्या भव्य पटांगणावर पंधरा फूट उंचीचा रावण दहन करण्यात आले.

खातीपुरा परिसरातील युवक मंडळीनी एकत्रित येत सदर कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले. मागील पंधरा दिवसापासून रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे काम सुरू होते. नवरात्र उत्सवाच्या मध्यंतरी पावसाने धुमाकूळ घातलेला होता. त्या प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढत रावणाची प्रतिकृती तयार करण्याचे काम खातीपुरा परिसरातील युवकांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ता सचिन घुमरे, नगरसेवक मयूर तळेकर, दीपक लांजेवार यांची उपस्थिती होती. त्यानिमित्ताने निघालेल्या विजयी मिरवणूकीत प्रभू श्रीरामासह सितामाई, लक्ष्मण, हनुमान यांसह रावण-वानरसेनेच्या प्रतीकात्मक लढाईने उपस्थितांची मने जिकंली. प्रभू रामचंद्रच्या वेशभूषेत शैलेश चाचेरकर, लक्ष्मण शिवम चट्टे, सीता नैतिक चकोले, हनुमान अथर्व तळेकार, राक्षसीन शुभम देवतळे नी साकारली. व परिसरातील बालगोपाल वानर सेनेच्या वेशभूषेत आकर्षक दिसत होती.

गावात वाजत गाजत रॅली काढण्यात आली. श्री महारुद्र हनुमान मंदिर (खातीपुरा) परिसरात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित बाणाने रावणाचे दहन करण्यात आल्यानंतर भाविकांनी “प्रभू सियावर रामचंद्र की जय” चा जयघोष केला. रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहण होताच उपस्थितांनी विजयोत्सवाचा एकच जल्लोष केला. दहणापूर्वी आणि नंतर प्रचंड फटाक्यांची आतषबाजीने आसमंत उजळून निघाला होता. दरम्यान, महारुद्र हनुमान मंदिरात विशेषारती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभम शेंडे, आकाश शेंडे, प्रशांत शेंडे, विनय बोरकर, गजु देवतळे, स्वप्नील चाचेरकर, अंगद शेंडे, राजु शेंडे, नरेश देवतळे, मनोज देवतळे, चंदू वांढरे, रुपेश देवतळे, विनोद चवरे, रोशन शेंडे, कार्तिक लेंडे, आकाश गुरणले, कुणाल बावणे प्रयत्नरत होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.