कन्हान :- नुकत्याच पार पडलेल्या स्थानिय निवडणु कित नवनियुक्त कन्हान, कांद्रीचे नगराध्यक्ष व कांद्री येथिल समाजाची नगरसेविकाचा आदिवासी गोवारी समाज रामटेक व कन्हान-कांद्री शाखे व्दारे नागरी सत्कार करण्यात आला.
आदिवासी गोवारी समाज रामटेक व कन्हान-कांद्री शाखे तर्फे कांद्री येथे नवनियुक्त कन्हान नगरपरि षदचे अध्यक्ष राजेंद्र शेंदरे, कांद्री नगरपंचायत नवनियुक्त नगराध्यक्ष सुजित पानतावणे व आदिवासी गोवारी समाजातील कांद्री नगरपंचायत नगरसेविका सविता राऊत यांचे गोवारी समाजाचे नेते, गोवारी समाज अंमलबजावणी व संनियंत्रण समिती महाराष्ट अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) कैलाश राऊत यांचा हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष अविनाश सोनवाणे, नंदकिशोर कोहळे, माजी नगरसेवक अनिल ठाकरे, जयदेव राऊत, गोवारी समाजाचे नेते नेवालाल सहारे, संघटनेचे सचिव आनंद सहारे, जीवन राऊत, ब्रम्हानंद नेवारे, बलधारी नेवारे, नरेश कोहळे, दिनेश राऊत सह आदिवासी गोवारी समाज बांधव उपस्थित प्रामुख्याने उपस्थित होते.