spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर, उपमहापौर कार्यालयांच्या नूतनीकरणाला सुरूवात

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या निकालानंतर मनपा मुख्यालयातील महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्ताधारी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते व गट नेत्यांच्या दालनांची डागडुजी आणि नूतनीकरणाचे काम मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील महापौर व उपमहापौरांचे कक्ष सज्ज करण्यात येत आहे.

मनपा मुख्यालयातील महापौर आणि उपमहापौरांच्या दालनांसह स्थायी समितीचे अध्यक्ष, सत्ताधारी पक्ष नेते, विरोधी पक्ष नेते आणि विविध राजकीय पक्षांच्या गटांच्या कार्यालयाची साफसफाई सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भिंतींची रंगरंगोटी, फर्निचरची दुरुस्ती आणि विद्युत उपकरणांची तपासणी केली जात आहे.

महापौर आणि उपमहापौर यांच्या कक्षात नवीन पडदे, कार्पेट आणि आसन व्यवस्था अद्ययावत केली जात आहे. विविध राजकीय पक्षांच्या गट नेत्यांच्या कार्यालयांमध्ये डागडुजी करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्ष नेता, गट नेते, विरोधी पक्ष नेते व इतर पक्षातील गट नेता याकरिता आसन व्यवस्था तयार करण्याचे कामही सुरू आहे.

Popular Articles