spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी, खापा नगरपरिषद येथे सदस्य पदाचे आरक्षण जाहिर

खापा :- राज्यातील आगामी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सोमवारी खापा शहरातील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर राजकीय पटलावर घडामोडींना वेग आला आहे. सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने मातब्बरांमध्ये ही बिगफाइट होणार असून, खापा नगरपरिषद येथील सदस्य पदाचे प्रभागांचे आरक्षण सोडत बुधवार ( दि.८) पार पडली.

येथील नगरपरिषद सभागृहात सकाळी ११ वाजता दरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी इंदिरा चौधरी (राज शिष्टाचार) व नगरपरिषदचे मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली.

“सदस्याची सोडत खालील प्रमाणे आहे.”

प्रभाग क्रमांक १ मध्ये [(अ) अनु जमाती (खुला) (ब) सर्वसाधारण ( महिला)] , प्रभाग क्रमांक २ मध्ये [(अ) ना.मा.प्र.( महीला), (ब) सर्वसाधारण (खुला)] , प्रभाग क्रमांक ३ मध्ये [(अ) अनु. जमाती ( महीला), (ब) सर्वसाधारण ( खुला) ], प्रभाग क्रमांक ४ मध्ये, (अ) ना.मा.प्र.(खुला), (ब) सर्वसाधारण (महिला) , प्रभाग क्रमांक ५ मध्ये (अ) ना.मा.प्र.( महीला) ५(ब) सर्वसाधारण (खुला) , प्रभाग क्रमांक ६ मध्ये (अ) अनु. जाती(खुला) (ब) सर्वसाधारण ( महीला) प्रभाग क्रमांक ७. मध्ये अ) ना.मा.प्र.(महीला) (ब) सर्वसाधारण ( खुला) , प्रभाग क्रमांक ८ मध्ये

(अ)अनु.जमाती( महीला) (ब) ना.मा.प्र.(खुला), प्रभाग क्रमांक ९ मध्ये (अ)अनु.जाती( महीला) (ब) सर्वसाधारण ( खुला), प्रभाग क्रमांक १० मध्ये (अ) अनु. जमाती( खुला)(ब) सर्वसाधारण (महिला) अशाप्रकारे प्रभागातील आरक्षण आहे.

एकुन १० प्रभाग असुन प्रत्येक प्रभागात दोन सदस्य असल्याने एकुन सदस्य संख्या २० आहे. आक्षरक्षण सोडत जाहीर होताच अनेक इच्छुक मंडळी निवडणूकीच्या तयारीला लागले आहे. तर काहींचा आरक्षणमुळे हिरमोड झाला आहे.

Popular Articles