नागपूर ०७ : रिजर्व बैंक हलबा कर्मचारी संस्थे तर्फे नोटबुक व शालेय साहित्य वितरण कार्यक्रम रविवारी ६ जुलै रोजी संत कबीर हायस्कूल, राष्ट्रसेवा विद्यालय व कोलबा स्वामी उच्च प्राथमिक शाळा या तिन्ही शाळेचे संयुक्तपणे संत कबीर हायस्कूलच्या सभागृहात, नाईक तलाव, बांग्लादेश, नागपूर येथे राजकुमार डेकाटे यांच्या अध्यक्षात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विश्वनाथजी आसई, संयोजक आदिवासी संघर्ष समिती, रवी पराते अध्यक्ष मध्य नागपूर, राष्ट्रवादी कॉग्रेस, सौ.अर्चना गजभीये, मुख्याध्यापीका, राष्ट्रसेवा विध्यालय, लालगंज, नागपूर तसेच सौ.आरती गोखले, मुख्याध्यापीका, संत कबीर हायस्कूल यांचे शुभहस्ते नोटबुक व शालेय साहित्य वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक संस्थेचे सचिव भास्कर चिचघरे यांनी केले. प्रास्तावीका मध्ये संस्थेच्या कार्याची माहिती संविस्तरपणे सचिवांनी दिली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी संस्थे द्वारे समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वितरण करून समाजाचा गरीब विध्यार्थ्यांना मदत करणे हे फार मोलाचे कार्य आहे. शिक्षणामुळे समाज प्रगत होऊन देशाच्या प्रगतीमध्ये सुध्दा मदत होत असते. संस्थे द्वारे अश्या प्रकारचे कार्यक्रम निःस्वार्थपणे राबवीत असतात याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. असे पाहुण्यांनी आपले मत व्यक्त केले. नोटबुक व शालेय साहित्य वितरण वर्ग 5 वी ते 10 वी च्या 100 (शंभर) विध्यार्थ्याना करण्यात आले. पाहुण्यांनी विध्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक प्रगतीसाठी आशीर्वाद दिले. नोटबुक व शालेय साहित्य वितरण कार्यक्रमाचे संचालन मनोहर बारापात्रे यांनी तर आभार हेमराज चांदेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम केले.







