कामठी नगर परिषद मध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा- चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

0
71

– धर्माचे राजकारण सोडून विकास कामांला पाहून मतदान करा.

– कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित 

– भाजप कार्यकर्ता संवाद मेळावा

कामठी :- आगामी नगर परिषद निवडणुकीत मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, यावेळी नेत्यांच्या मागे फिरणाऱ्यांना तिकीट दिली जाणार नाही. तर शहरातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील कार्यकर्त्याला तिकीट दिली जाईल. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत शासनाच्या योजना पोहचवा. विकास कामे करण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला निवडून आणा तरच केंद्र आणि राज्य सरकारने दिलेला निधी योग्य तऱ्हेने आपल्या भागात विकासकामांवर खर्च होईल. काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले तर विकासाचा बट्ट्याबोळ करतील. आमचे सरकार हे लोक कल्याणकारी सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या जीवनाश्यक वस्तूंवरील कर कमी केला. त्यामुळे आता सर्वसामान्यांचे जीवन सुकर होणार आहे. आपण भाजप ला दिलेले मत किती महत्त्वाचे आहे याचा प्रत्येय आपल्याला आला असेल. जे वचन आम्ही विधानसभा निवडणुकीत तुम्हाला दिले होते ते पूर्ण करणार आहोत. ज्यांना घर नाही त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली जाणार आहे. लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, शेतकऱ्यांकडून मोटार पंपाचे वीजबिल घेणार नाही, सर्वसामान्य ग्राहकांची वीज दरवाढ करणार नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द आम्ही पाळणार आहेत. महसूल विभागाचा मंत्री म्हणून मी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना फायदा होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला बहुमताने विजयी करा, यासाठी जोमाने कामाला लागा, असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

2029 पर्यंत कामठी शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम भारतीय जनता पार्टी करत आहे येत्या काही दिवसात कामठी शहरात मेट्रो धावणार आहे तामती शहर मेट्रोसिटीच्या नावाने ओळखले जाणार आहे कामठी शहरामध्ये अनेक विकास कामे झपाट्याने सुरू आहे, शॉपिंग मॉल च्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे,

सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामठी नगरपालिका काबीज करण्याचे आव्हान केले.

यावेळी माजी आ.टेकचंद सावरकर, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, कोषाध्यक्ष अजय अग्रवाल, शहराध्यक्ष मंगेश यादव, नंदा बारई, बरकत अली, अल्पेश लांजेवार, विवेक मंगतानी , संजय कानोजिया, सुनील खानवाणी, उज्वल रायबोले , कपिल गायधने, लालसिंग यादव,यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.