spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महसूल अधिकारी हा प्रशासनाचा कणा- तहसिलदार गणेश जगदाडे

 

कामठी तहसील कार्यालयात विशेष महसूल सप्ताह चा  शुभारंभ

कामठी ता. २ :- महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे.महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे.जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्याच्या दैनंदिन जिव्हाळ्यांच्या प्रश्नांचा   ज्यांच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळें त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करुन नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन कामठीचे  तहसीलदार गणेश जगदाडे   यांनी कामठी तहसील कार्यालयात आयोजित महसूल दिन कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.तसेच  कामठी तहसील कार्यालय तर्फे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यंत विशेष महसूल सप्ताह  राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार आज 1 ऑगस्ट ला महसूल सप्ताहाचा  शुभारंभ कामठी तहसील कार्यालयातील महसूल संवर्गातील  कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद घालून उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कारीत करून करण्यात आले..या अंतर्गत लाभार्थ्यांना  आवश्यक ते दस्तावेज लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.

जसे की 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसे 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे आर्थिक वर्ष मानले जाते. यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. 1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून  आपल्या कामाचे परीक्षण   करण्याचा दिवस आहे.

शासनाचा मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे.जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे,गौंणखणींजस्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही,विविध खात्याची थकीत वसुली,पाणी वापर परवानगी,रस्ता देणे, अडवलेले रस्ते खुले करणे,पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे,सर्व प्रकारच्या निवडणुका,जनगणना,आर्थिक गणना,कृषी  गणना,आधार कार्ड,विविध सामाजिक योजना,रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यांमार्फतच राबविले जातात.लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे.त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात. म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाडे   यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले,नायब तहसिलदार ,
महिला नायब तहसीलदार, पुरवठा विभागाचे अधिकारी, तहसीलदार प्रस्तुतकार मिथिलेश कोल्हे, भुपेंद्र निमकर, ज्योती गोरलेवार, माधुरी उईके, वैशाली मेश्राम, तसेच सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कर्मचारी गण  तसेच सुधीर चव्हाण, राम उरकुडे, कुंजीलाल पानतावणे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अव्वल माधुरी उईके यांनी केले तर आभार प्रदर्शन मिथिलेश कोल्हे  यांनी मानले.

या महसूल सप्ताह मध्ये  1 ऑगस्ट ला महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी

कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्याना विविध प्रमाणपत्र वितरण समारंभ, 2 ऑगस्टला शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करमे, 3 ऑगस्ट ला पांदण रस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, 4 ऑगस्ट ला छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडलनिहाय राबविणे , 5 ऑगस्टला विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्याना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे, 6 ऑगस्ट ला शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनीबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे तर 7 ऑगस्ट ला एम सेंड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणाली प्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे कार्यक्रमाने महसूल सप्ताहाची   सांगता करण्यात येईल.

Popular Articles