spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सलीम खेतानी हे समाजसेवक नाहीत, तर ते माणुसकीचे एक जिवंत उदाहरण आहेत

पांढरकवडा :- माणूस म्हणून जन्माला येऊन माणसाच्या कामी येणं, या विचाराला खरं करून दाखवणारे एक असामान्य व्यक्तिमत्त्व म्हणजे पांढरकवडा शहरातील सलीमभैय्या खेतानी. गेल्या १५ वर्षापासून आपली सेवा अखंडपणे देत, खेतानी यांनी शेकडो वंचितांच्या आयुष्यात आशेचा किरण पेरला आहे. त्यांच्या कार्याला ‘खेतानी फाउंडेशनच्या’ माध्यमातून एक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. सलीमभैय्यांच्या कार्याची व्याप्ती केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित नाही, तर ती समाजाच्या विविध स्तरांवर खोलवर रुजलेली आहे. त्यांच्या कार्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: आरोग्यसेवेचा आधार: अनेक गरीब रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत पुरवणे आणि त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची संपूर्ण आर्थिक जबाबदारी उचलणे हे खेतानी फाउंडेशनचे एक महत्त्वाचे कार्य आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवदान मिळाले आहे. शिक्षणाची ज्योत:” गरीब कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून, सलीम यांनी त्यांना उज्ज्वल भविष्याची दिशा दिली आहे. शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी ते एक वरदान ठरले आहेत. मोफत रुग्णवाहिका सेवा: ‘खेतानी फाउंडेशन’ मार्फत गरीब रुगणांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळवणे शक्य होते. नवरात्री आणि गणेश चतुर्थी उत्सव कोणताही गाजावाजा न करता, सलीम स्वतः नवरात्री आणि गणेश उत्सव- यावेळेस स्वखुशीने भोजनाचे व्यवस्था करतात, आपला चेहरा न दाखवता, मदतीचा हात पुढ़े करण्याची त्यांची ही’छुपी मदत’ अनेकांसाठी आनंदाचे क्षण आणण्याचे कारण ठरते. कन्यादानाचे पुण्यः” गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी उचलून, सलीम यांनी अनेक माता-पित्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे अनेक मुलींचे लग्न निर्विध्नपणे पार पडले आहे. या सर्व सेवांमध्ये ‘ खेतानी फाउंडेशन “अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत.

खेतानी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांमुळे त्यांच्या समर्पित कार्यामुळेच सलीमभैय्यांची ही मानवसेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचत आहे. सलीमभैय्या खेतानी हे केवळ एक समाजसेवक नाहीत, तर ते माणुसकीचे एक जिवंत उदाहरण आहेत. त्यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असून, ते खऱ्या अर्थाने समाजाचे ‘मसीहा’ उरले आहेत, त्यांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.