सावनेर :- तालुक्यातील खापा येथील कन्हान नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर रेती पडून असल्याने वाहनचालकांसाठी गंभीर धोका निर्माण झाला होता. विशेषतः दुचाकीस्वारांची मोटारसायकल स्लिप होऊन अपघात होण्याची शक्यता वाढली होती.
ही बाब स्थानिक नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना कळवली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन हितेश बनसोड यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून रस्त्यावर पडलेल्या रेतीबाबत माहिती दिली.![]()
यावर खापा येथील पोलीस निरीक्षक किशोर भुजाडे यांनी पुढाकार घेत त्वरित साफसफाईची कार्यवाही सुरू केली. प्रशासनाने तत्काळ रस्त्यावरील रेती हटवून मार्ग सुरक्षित केला.
स्थानिक नागरिकांनी वेळेत कारवाई झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, अशा धोकादायक परिस्थितीत त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानले.