मौदा :- सराईत आरोपी नामे विनोद शेषराव भोयर, वय ४५ वर्ष, रा. प्लॉट नं. ५२१, गोकुळ डेयरी जवळ, भारत नगर, कळमना मार्केट, पो.स्टे. कळमना, नागपुर याचे वर नागपुर शहर आणि नागपुर ग्रामीण येथे अवैधरित्या विनापरवाना रेती चोरीचे अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपी अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे. असे गुन्हे करून तो शासनाचा महसुल बुडवुन शासनाचे आर्थिक नुकसान करतो तसेच पर्यावरणाला नुकसान पोहचवतो. नागपुर ग्रामीण पोलीसांनी त्याचेविरूध्द वेळोवेळी कारवाई करून त्याचेवर गुन्हे नोंद करून त्याला अटक केले आहे नमुद आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी त्याचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी विनोद शेषराव भोयर याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली.
हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात मौदा पोलीसांकडुन एमपीडीए कायदयान्वये कार्यवाही करण्यात आली. दिनांक २३/०२/२०२६ रोजी जिल्हाधिकारी, नागपुर यांनी सराईत गुन्हेगार विनोद शेषराव भोयर याचे विरूध्द स्थानबध्दतेता आदेश काढला असता मौदा पोलीसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेतले असुन नमुद आरोपीला अटक करण्याची प्रक्रीया सुरू आहे.