कन्हान :- मारोतराव पानतावने काॅलेज कांद्री-कन्हान येथे संघमित्रा वंदना सखी मंच व्दारे महिलाचा स्नेह मेळावा थाटात संपन्न झाला.
संघमित्रा वंदना सखी मंच व्दारे स्नेह मेळावा मारोतराव पानतावने काॅलेज कांद्री-कन्हान येथे भदंत नाग दिपंकर महास्थविर सदस्य-दिक्षाभूमी स्मारक समिती,नागपुर यांच्या अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी प्रदीप डोंगरे राष्ट्रीय जीओसी, एसएसडी, विजय ऊके बुद्ध धम्म प्रचारक, उपाध्यक्ष-आदर्श कवी मंडळ, देवानंद बडगे अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मंडपे माजी मुख्याध्यापक, अँड. मोनाली अपर्णा संविधान जागर अभियान, माया ढाकणे संविधान जागर अभियान, गणेश पानतावने संस्थापक मारोतराव पानतावणे काॅलेज, सारीका धारगावे अध्यक्ष संघमित्रा वंदना बहुउद्देशीय संस्था, कल्पना पाटील कोषाध्यक्ष आदी मान्यवरांच्या महामानवाच्या प्रतिमेस माल्यार्पण करून बुध्द वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. स्वागत गीत व रमाई गीत रमा मेश्राम यांनी सादर केले. बडगे यांनी विविध प्रयोगा द्वारे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य समजावुन सांगितले. विजय ऊके यांनी आपल्या भाषणात नमुद केले की आंबेडकरी चळवळीत स्त्रियांचे महत्वाचे स्थान आहे. मंडपे यांनी सांगितले की अंधश्रद्धेमुळे समाजाची प्रगती होत नाही. सापशिडीच्या माध्यमातुन संविधानाचे महत्व पटवुन दिले. तसेच विजय पाटील, प्रदीप डोंगरे, अँड. मोनाली अपर्णा यांनी मार्गदर्शन केले. समाजाच्या प्रगतीसाठी संघटन अत्यंत महत्वाचे आहे. असे भदंत नाग दिपंकर यांनी अध्यक्षी य मार्गदर्शनात संबोधित केले. 

सारीका धारगावे यांनी आपल्या प्रस्ताविकातुन नमुद केले की संघमित्रा वंदना संघ सखी मंच या संघ टनेचा मुख्य उद्देश म्हणजे आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग असावा. समाजातील महिला मुख्य प्रवाहात याव्यात. यासाठीच संघमित्रा वंदना संघ नऊ वर्षांपासुन कार्यरत आहे. तसेच अंधश्रद्धा दूर करून समाजात वाचन संस्कृती रूजावी यासाठी प्रयत्नशील राहुन सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य अविरत सुरू राहणार आहे. कार्यक्रमाचे संचालन गौतमी गजभिये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कल्पना पाटील, प्रतिभा मेश्राम, रमा मेश्राम, रमा भेलावे, रेखा रामटेके, सोनु गणविर, जयश्री मेश्राम, अर्चिता फुलझे ले, माया हुमणे, मंदा बागडे, गौतमा राऊत, सीमा अड कणे, मालती कोल्हटकर, वंदना शेंडे, रीमा पानतावने, संगीता रामटेके, अनिता पाटील, हरिदास धारगावे यांनी परिश्रम घेतले. शारदा वारके, दिपा सोमकुंवर, सुजाता भेलावे, आशा मेश्राम, जयश्री मेश्राम, निता मेश्राम, माया चांदुरकर, मनुकला वाघमारे, वैशाली पाटील, वैशाली मेश्राम, रमा ऊके, प्रतिक्षा चवरे, प्रियंका वाघधरे, विद्या पानतावने, वैशाली देविया सह कार्यकर्ते उपस्थित होते.








